प्रजातींचे नाव – सागवान

वैज्ञानिक नाव – टेक्टोना ग्रँडिस (Tectona grandis)

सामान्य नाव – सागवान

कूळ – लेमियेसी (Lamiaceae, Verbenaceae)

स्थान,आढळ– साग हा फक्त भारतात मुळ आढळणारा मानला जातो. भारतात मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आसाम, बिहार, ओरिसा, अंदमान आणि पश्चिम बंगालच्या काही भागांमध्ये आढळतो.

उपयुक्त हवामान – किमान पाऊस (1200-2500 मिमी) आणि समुद्रसपाटीपासून कमी उंची असलेल्या भागात सागवानाची वाढ चांगली होते. 13-17 अंश सेल्सिअस ते 39-44 अंश सेल्सिअस तापमान त्याच्या वाढीसाठी योग्य मानले जाते. झाडाच्या चांगल्या वाढीसाठी खोल, सुपीक आणि पाण्याचा निचरा होणारी माती आवश्यक असते आणि ती किंचित आम्लयुक्त किंवा अल्कधर्मी जमिनीतही वाढीसाठी चांगली असते.

रोपवाटीका तंत्रज्ञान

बियाणे – कमीत कमी 15 दिवस आळीपाळीने भिजवून कोरडे केल्याने उगवण सुधारते. सागाच्या बियांची उगवण साधारणपणे 10-70% च्या दरम्यान वाढते. पेरणीसाठी नेहमी मोठ्या आकाराचे (किमान 14 मिमी व्यासाचे) बियाणे निवडून  त्या फळाच्या व्यासाच्या समान खोलीवर पेराव्यात. बियांमध्ये उगवण साधारणपणे १५ दिवसांत सुरू होते आणि ४५ दिवस चालू राहते. शेतात लागवडीसाठी एक वर्ष जुनी रोप निवडावी.

अभिवृध्‍दी – सागवान लागवड स्टंपद्वारे केली जाते. स्टंपसाठी, लहान रोपाचे स्टेम आणि रूट अनुक्रमे 2.5 सेमी आणि 22.5 सेमी. लांबीमध्ये ठेवून, उर्वरित भाग काढून टाकला जातो. स्टेम तिरकसपणे कापले पाहिजे जेणेकरून पावसाचे पाणी स्टेमच्या कापलेल्या भागावर राहू नये आणि रूट आडवे कापावे. मुख्य मुळांच्या सभोवतालची बारीक मुळे देखील छाटावीत आणि तयार केलेला स्टंप पुन्हा पॉलिथिनमध्ये किंवा शेतात 2-3 दिवसात लावावा.

लागवड तंत्रज्ञान – शेतात लागवड करण्यापूर्वी लावावा. खोल नांगरणी करावी व 2 x 2 मी, 3 x 3 मी किंवा 4 x 3 मी अंतरावर 45 x 45 x 45 सें.मी. आकाराचे खड्डे तयार करावेत.कृषी वनीकरणामध्ये सागवानाची लागवड शेताच्या आत करावयाची असल्यास खड्डे ६ x २ मीटर किंवा 2 x 2 मी. च्या अंतरावर करावे. जेणेकरुन ओळींमधील पिकांची यशस्वीपणे लागवड करता येईल. खड्डा भरताना प्रति खड्डा 5- 10 किग्रॅ. चांगले कुजलेले शेण आणि 10 मि.लि. क्लोरपायरीफॉस टाकणे आवश्यक आहे. शेतात स्टंप लावायचा असल्यास कुदळीचा (crowbar) वापर करावा. पुरेसा पाऊस असताना पेरणीसाठी योग्य वेळ जुलै-ऑगस्ट आहे. झाडे लावल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांत आठवड्यातून एकदा पाणी द्यावे.

तण व्यवस्थापन

खुरपणी – आंतरपीक नसताना लागवड पद्धतीत सुरुवातीच्या 2-3 वर्षांसाठी वर्षातून 2-3 वेळा तण काढणे आवश्यक आहे.

खते – सागवान झाडांना पहिल्या वर्षी नायट्रोजन: स्फुरद: पोटॅश 50:30:20 ग्रॅम प्रति झाड या प्रमाणात द्यावे. दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी त्याचे प्रमाण अनुक्रमे 100:60:40 आणि 150:120:90 ग्रॅम प्रति झाड ठेवावे. लागवड करण्यापूर्वी 10 कि.ग्रॅ. प्रत्येक खड्ड्यात कुजलेले शेणखत टाकावे.

रोपांची छाटणी – सागवानामध्ये सरळ खोडाचे आर्थिक महत्त्व अधिक असते आणि त्यासाठी खोडावर येणाऱ्या अनावश्यक फांद्या तोडल्या पाहिजेत. त्यामुळे झाडाची वाढही चांगली होते. कापणीपासून मिळणारे लाकूड घरगुती इंधन म्हणून वापरले जाऊ शकते. सागवानाची छाटणी कृषी वनीकरणात जास्त महत्त्वाची असून छाटणी करताना खोडावर गाठी राहणार नाहीत याची विशेष काळजी घ्यावी.

विरळीकरण – सागवान जेव्हा 2 x 2 मी अंतरावर लागवड केल्यास 5-7 वर्षांना विरळीकरण करणे आवश्यक आहे. विरळीकरण करण्याच्या पहिल्या टप्प्यात, प्रत्येक दुसरे झाड ओळीतून काढून टाकावे आणि त्यानंतर 5-6 वर्षांच्या अंतराने विरळीकरण करावे. हे केल्याने सागवानापासून उत्तम दर्जाचे लाकूड मिळते, ज्याला बाजारात चांगली किंमत मिळते. परंतु कृषी वनीकरण पद्धतीमध्ये योग्य अंतरावर ओळीत लागवड केलेल्या सागवानाची 10 वर्षांपर्यंत  विरळीकरण करण्याची गरज पडत नाही.

उपयुक्‍त कृषी वानिकी पध्‍दत– कृषी वनीकरण अंतर्गत सागाची लागवड वेगवेगळ्या प्रकारे करता येते. त्याची लागवड शेताच्या सीमेवर किंवा बांधावर करता येते. याशिवाय खरीप व रब्बी पिकांची लागवड हवामानानुसार शेतात योग्य अंतरावर ओळीत करून लागवड करता येते.

वनस्पती संरक्षण – लीफ स्केलेटोनायझर (Eutectona machaeralis) आणि लीफ डिफोलिएटर (Hyblaeap urea) हे सागवानातील मुख्य कीटक आहेत. D.05 टक्के क्विनोलफोस किंवा 10000 P.P.M. निंबोळी तेलाची फवारणी करून त्यावर नियंत्रण ठेवता येते. मात्र, कीटकनाशक फवारणी तेव्हाच करावी जेव्हा खूप नुकसान होते. याशिवाय सागात स्टेम बोअरर कीटकाचाही प्रादुर्भाव होतो, त्यासाठी कीटकाने जिथे छिद्र केले जाते तेथील किटकाचे अवशेष काढून टाकल्यानंतर ०.२ टक्के क्विनोलफॉस टाकावे. काही भागात सागवानावरही झाडाचे परजीवी (Dendrophthoespp) येते, ते कापून काढावे.

उत्पन्न – साधारणपणे 25 वर्षांच्या चक्रात 2 x 2 मी. अंतरावर लागवड केलेल्या सागवानापासून लाकडाचे सरासरी उत्पादन 1.5 ते 2 घ.मी. प्रति हे. प्रति वर्ष मिळते. सागाचे योग्य व्यवस्थापन केल्यास प्रति झाड 0.60 घनमीटर लाकूड 20 वर्षात मिळू शकते.

उपयोग – फर्निचर, ड्रॉवर, प्लायवूड, पटल, खांब, जहाजे इत्यादी बनवण्यासाठी सागवान लाकडाचा वापर केला जातो.

संपर्क व्यक्ती – भारतीय कृषी संशोधन परिषद, केंद्रीय कृषी वानिकी संशोधन संस्था, झाशी