प्रजातींचे नाव-ग्लिरिसिडिया

शास्त्रीय नाव- ग्लिरिसिडिया सेपियम (Gliricidia Sepium)

सामान्य नाव- मेक्सिकन लिलाक

कूळ फैबेसी (Fabaceae)

पोटजाती – फाबाईडी (Faboideae)

स्थान, अढळ – ग्लिरिसिडिया हे नैसर्गिकरित्या समुद्रसपाटीपासून 1600 मीटर उंचीपर्यंत आढळते. हे झाड मेक्सिको, उत्तर आणि दक्षिण अमेरिकेतही आढळते. हे जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि सिक्कीम वगळता भारतात सर्वत्र आढळते.

उपयुक्त हवामान – हे झाड कोरड्या भागात पर्णपाती असते परंतु जेथे जास्त पाऊस आणि आर्द्रता वर्षभर राहते तेथे सदाहरित राहते. हे दंव सहन करू शकत नाही, म्हणून हे झाड समुद्रसपाटीपासून 1600 मीटर उंचीवर आढळत नाही. ग्लिरिसिडिया सर्व प्रकारच्या मातीत, वालुकामय, चिकणमाती, किंचित अल्कधर्मी किंवा कॅल्शियमयुक्त मातीत सहज आढळते. तथापि, पाणी साचलेले क्षेत्र त्याच्या वाढीसाठी हानिकारक आहे. त्याच्या वाढीसाठी योग्य तापमान 21 ते 29 अंश सेल्सिअस पर्यंत असते. हे झाड दुष्काळालाही सहन करते आणि 650 मिमी ते 3500 मिमी पर्जन्यमान असलेल्या भागात ग्लिरिसिडियाची लागवड करता येते.

रोपवाटीका तंत्रज्ञान

बियाणाद्वारे -बियाणे 8 ते 10 तास पाण्यात भिजत ठेवावे, भिजवलेले बियाणे लाल माती, वाळू आणि शेणखत यांचे मिश्रणाने भरलेल्या लहान पॉलिथिन पिशव्यामध्ये पेरले पाहिजे आणि त्यावर वेळोवेळी पाणी शिंपडावे. साधारणपणे ३ ते ४ महिन्यांची रोपे शेतात लावण्यासाठी योग्य होतात. मोठ्या रोपवाटिका तयार करताना  बियाण्यांद्वारे रोपे तयार करणे अधिक उपयुक्त आहे.

अभिवृध्दी

कलमाद्वारे : स्टेम (डहाळया) कटिंग्जपासून रोप तयार करण्यासाठी, सर्वप्रथम, 30 ते 100 सेमी लांब आणि 2 ते 6 सेमी व्यासाच्या हलक्या हिरव्या तपकिरी डहाळ्या निवडाव्यात आणि नंतर स्टेम कटिंग्ज दोन्ही बाजूंनी व्यवस्थित कापून घ्याव्यात. त्यानंतर तळापासून 20 ते 50 सेंमी खोल जमिनीत स्टेम कटिंग लावावी. पावसाळ्यात स्टेम कटिंग्ज कापल्यानंतर लगेच लागवड करावी, स्टेम कटिंग्जपासून तयार केलेली झाडे झपाट्याने वाढतात.

लागवड तंत्रज्ञान –शेतात लागवड करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जाऊ शकतात जसे की दुहेरी ओळ किंवा त्रिकोणी पद्धत इ. शेतात प्रति हेक्टर 4000 ते 10,000 झाडे लावता येतात परंतु जैविक बांधासाठी लावताना 1.50 ते 2.5 मीटर लांबीचे आणि 5 ते 10 सेमी व्यासाचे रोपे 1.5 – 5 मी अंतरावर लावली जातात.

कृषी वनीकरण पद्धतीत झाडे नेहमी पूर्व ते पश्चिम दिशेला लावावीत जेणेकरून आंतरपिकांना जास्तीत जास्त सूर्यप्रकाश मिळू शकेल.

तण व्यवस्थापन- जर ग्लिरिसिडिया हेज म्हणून लागवड केली असेल, तर वेळोवेळी छाटणी करणे आवश्यक आहे. छाटणी वर्षातून तीनदा करावी. पहिली कापणी जूनमध्ये, दुसरी नोव्हेंबरमध्ये आणि तिसरी कापणी मार्चमध्ये करावी. लावणीच्या 1 वर्षानंतर, ते 75 सेमी ते 1 मीटर उंचीवर कापून त्याची पाने वापरली जाऊ शकतात. ग्लिरिसिडियाची पाणी उपलब्ध असलेल्या भागात फक्त चाऱ्यासाठी लागवड केली जाते आणि 6 ते 12 आठवड्यांच्या अंतराने कापणी केली जाऊ शकते.

उपयुक्त कृषी वानिकी पध्दत – सामान्यतः ग्लिरिसिडियाने सोबत मका पिकाचे आंतरपीक घेतले जाते. शेतकरी  मातीतील नत्र स्थिर करण्यासाठी आणि धूप रोखण्यासाठी शेतात ग्लिरिसिडिया लावतात. कॉफीच्या व कोकोआ मळ्यातही हे सावली देणारे झाड म्हणून लावले जाते.

वनस्पती संरक्षण – ग्लिरिसिडियाची लागवड उष्ण कटिबंधात मोठ्या प्रमाणावर केली जात असली तरी ती सामान्यतः गंभीर रोगांपासून सुरक्षित असते. तथापि, मध्य आणि दक्षिण अमेरिका, कॅरिबियन, आफ्रिका, आग्नेय आशिया आणि पॅसिफिकमध्ये, ग्लिरिसिडियामध्ये सारकोस्पोरिडियम ग्लिरिसिडिएन्सिस, चॉकलेट किंवा ब्राऊन लीफ स्पॉट नावाचा रोग आढळून आला आहे. ओलसर भागात या झाडाची पाने गळून पडतात आणि काही भागात अ‍ॅफिड/महू किडीचा प्रादुर्भावही आढळून येतो. सुमारे 16 प्रांतांच्या मूल्यांकनात, असे आढळून आले की G-14, G-17 आणि H-14 या वाणामध्ये ऍफिड्सला उच्च प्रतिकार करण्याची क्षमता आहे.

उत्पन्न – संशोधनात असेही आढळून आले आहे की सर्वसाधारणपणे ग्लिरिसिडियाच्या पानांचा हिरवळीचे खत म्हणून वापर करावयाचा असल्यास सुमारे १५ टन/ हे. / वर्ष पानांपासून  ४० किलो/हे./वर्ष इतके नायट्रोजन देण्याची क्षमता यात असते. ग्लिरिसिडिया झाडांच्या कोरड्या पानांचे बायोमास प्रति हेक्टर प्रति वर्ष 2 टन ते 20 टन  प्रति हेक्टर प्रति वर्ष  असते.

उपयोग

हे विविध कारणांसाठी वापरले जाऊ शकते जसे की जैविक कुंपण, चारा, कॉफीसाठी सावलीचे झाड, सरपण, हिरवळीचे खत इत्यादी, कृषी वानिकी पध्दतीमध्ये ग्लिरिसिडियासह मक्याची लागवड करता येते आणि ग्लिरिसिडिया मक्यासाठी खत म्हणून काम करते. ग्लिरिसिडिया हे औषधी म्हणून देखील वापरले जाते. १ महिन्यात ते १ -२ मी इतकी उंची गाठते  म्हणून याचा वापर जैविक कुंपनासाठी केला जातो.

ग्लिरिसिडियाचा वापर वृक्षहीन भागात जमिनीच्या वरच्या मातीची धूप रोखण्यासाठी देखील केला जातो आणि ते जमिनीत नायट्रोजन फिक्सर म्हणून देखील कार्य करते, ज्यामुळे संबंधित पिकांचे उत्पादन वाढते.

संपर्क व्यक्ती

केंद्रिय कृषीवानिकी अनुसंधान संस्था, झाशी