प्रजातींचे नाव – मिलिया
शास्त्रीय नाव – मिलिया डुबिया (Melia dubia)
सामान्य नाव – मलावर कडुलिंब, घोडा कडुलिंब
कूळ – मिलियेसी (Mediaceae)
संभाव्य क्षेत्र – मिलिया हे केवळ दक्षिण भारतातील पश्चिम घाट प्रदेशातील असल्याचे मानले जाते. भारतात हे सिक्कीम, उत्तर बंगाल, आसाम, मेघालयातील खासी प्रदेश आणि दक्षिण भारतात आढळते. सध्या तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेश इत्यादी राज्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर लागवड करत आहेत.
योग्य हवामान – मिलियाचा 1000 मिमी ते जास्त पाऊस असलेल्या भागात आणि ओलसर भागात जास्त अढळ आहे. तथापि सिंचन प्रणालीसह 650-1000 मि.मी. पावसाळ्यातही सहज लागवड करता येते. मिलियाच्या वाढीसाठी योग्य तापमान 30-35°C असले पाहिजे परंतु ते 0°C ते 45° C पर्यंतचे तापमान सहन करू शकते. मिलिया हे हलके प्रकाश आवश्यक असणारे झाड आहे परंतु ते सागवान, कॅज्युरिना, नारळ इत्यादींसह हलक्या सावलीत वाढू शकते. मिलियाच्या रोपांच्या अवस्थेत जास्त दंव पडल्यामुळे जास्त नुकसान होते. यासाठी उत्तम निचरा होणारी लाल, लाल चिकणमाती, गाळ आणि काळी चिकणमाती योग्य आहे, ज्याची पीएच. मूल्य 5.5 ते 7.5 दरम्यान आणि मातीची खोली 1.5 मीटर असावी.





रोपवाटीका तंत्रज्ञान
बियाणे – जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात पिकलेल्या फळांपासून बिया गोळा केल्या जातात, ज्यावर 24 तास शेणाच्या द्रावणाने प्रक्रिया केली जाते आणि गादीवाफ्यांवर लागवड केली जाते. त्याच्या बियांची उगवण 10-60 टक्के असते, उगवणीसाठी सुमारे 90 दिवस लागतात.
अभिवृध्दी – कलम पद्धतीमध्ये, पेन्सिलच्या जाडीचे लहान वयाचे स्टेम कटींग वापरले जाते. यासाठी 1000-5000 P.P.M. IBA द्रावणाची 10-15 मिनिटे प्रक्रीया केली जाते व ते वाळूच्या माध्यमात लावले जाते आणि दिवसातून दोनदा पाणी दिले जाते. ४० दिवसांत कलमे रुजायला आणि ६ महिन्यांनी ती शेतात लावायला तयार होतात.
मिनी क्लोन तंत्रज्ञानाद्वारे – या पद्धतीत तीन महिने जुनी निरोगी उत्तम प्रतीची क्लोन रोपे 10 सेमी x 10 सें.मी. अंतरावर लागवड केली जाते आणि 30-45 दिवसांत 5-7 सेमी नोडल कटींग तयार होते. 1500 पीपीएम I.B.A. सोल्युशनने उपचार केल्यानंतर आणि 90 सीसीडीच्या रूट ट्रेनरमध्ये लागवड केल्यानंतर 15 दिवसांच्या आत मुळे येण्यास सुरुवात होते.
लागवड तंत्र – दोन वेळा शेतात खोल नांगरणी करून लागवडीसाठी शेत तयार करावे. शेत तयार केल्यानंतर 45 x 45 x 45 सें.मी. किंवा 60 x 60 x 60 सेमी. आकाराचे खड्डे एप्रिल-मे महिन्यात खोदून पावसाळ्यापूर्वी त्यात 3-5 किग्रॅ. कुजलेले शेणखत + 100-150 ग्रॅम निंबोळी पेंड + 50 ग्रॅम D.A.P. प्रति खड्डा मातीसह मिश्रण मिसळून खड्डे भरावेत.
तण व्यवस्थापन
निंदणी – खुरपणी – तण जास्त असल्यास सुरुवातीला खुरपणी किंवा नांगरणी करून तण काढावे.
खते – सुरवातीला चांगल्या वाढीसाठी, दर तीन महिन्यांतून एकदा, प्रति रोप 25 ग्रॅम NPK. चे मिश्रण दिले पाहिजे पावसाळ्याव्यतिरिक्त, 10-15 दिवसांच्या अंतराने सिंचन करणे आवश्यक आहे.
कापणी व छाटणी – मिलियाची लागवड सघन लागवड करताना योग्य अंतरावर केल्यास फारशी कापणी व छाटणी करावी लागत नाही, परंतु कृषी वनीकरणामध्ये जास्त अंतरावर लागवड करण्यासाठी कापणी व छाटणी करावी लागते. साधारणपणे, मिलियामध्ये छाटणीचे काम झाडाची उंची 2-3 मीटर असताना केली जाते यात मुख्य खोडावर येणाऱ्या अनावश्यक फांद्या काढून टाकल्या जातात.
विरळीकरण – मिलियाची दाट लागवड करताना (500 ते 5000 झाडे प्रति हेक्टर) दुसऱ्या, चौथ्या, सहाव्या आणि आठव्या वर्षी विरळीकरण करणे आवश्यक आहे. या प्रक्रियेत, रोपांना वाढण्यासाठी जागा देण्यासाठी आणि आपापसातील स्पर्धा कमी करण्यासाठी रांगेतील प्रत्येक वाळलेली किंवा रोगट झाडे काढून टाकावीत.
उपयुक्त कृषी वानिकी पध्दत– मिलिया डिसेंबर-फेब्रुवारीमध्ये पानगळ होते आणि छाटणी करता येते. त्यामुळे ते कृषी वनीकरणात योग्य मानले जाते. मिलियाची लागवड योग्य अंतरावर केल्यास हवामानानुसार भुईमूग, मिरची, हळद, गहू, उडीद, बार्ली, ऊस, केळी, पपई इत्यादी विविध पिके ओळींमध्ये घेता येतात. आजकाल शेतकरी चंदनाच्या लाकडासाठी मित्र वृक्ष म्हणून मिलियाची लागवड करतात.
वनस्पती संरक्षण
अ) लाल कोळी (Red spider mite), लक्षणे – पानांवर हिरवट पिवळे धब्बे येणे
उपचार – 2.5 मिली/लिटर पाण्यात किंवा 0.3 मिली या प्रमाणात डायकोफल फवारणी करणे. / प्रति लिटर पाणी मध्ये डेरीमिक्स फवारणी
b) लीफ ब्लाइट, लक्षणे – पानांवर तपकिरी ठिपके दिसतात. पानांवर पिवळी छिद्र पडणे, कुजणे आणि मरणे
उपचार – बोर्डो मिश्रण / 1% फवारणी किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड 0.125% किंवा कार्बेन्डाझिम 0.2% फवारणी 10-15 दिवसांच्या अंतराने करावी.
उत्पन्न – मिलियाची कापणी उपयुक्ततेच्या आधारावर केली जाते, म्हणून ती 3-10 वर्षांत कधीही केली जाऊ शकते. घनदाट लागवडीत (500-4444 झाडे प्रति हेक्टर) लागवड केलेली मिलिया 3-5 वर्षांत प्रति हेक्टर 150-250 टन लाकूड देऊ शकते.
उपयोग – मिलिया लाकडाचा वापर पॅकिंग बॉक्स, छतावरील फलक, इमारत बांधकाम, माचिस बॉक्स, पेन्सिल, शेतीची अवजारे, वाद्ये इत्यादीसाठी केला जातो.
संपर्क व्यक्ती –
भारतीय कृषी संशोधन परिषद -केंद्रीय कृषीवानिकी अनुसंधान संस्था, झासी
वानिकी महाविद्यालय, मेट्टुपालयम, कोईम्बतूर, तामिळनाडू
इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेस्ट जेनेटिक्स आणि ट्री ब्रीडिंग, कोईम्बतूर, तमिळनाडू