भारत सरकार व्दारा निर्गमित मार्गदर्शक तत्त्वांनुसार, महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत, सरकारने विहित केलेल्या पात्रतेशी सुसंगत असलेल्या व्यक्तींनाच नरेगा जॉब कार्ड दिले जातील. ज्या व्यक्ती ही पात्रता पूर्ण करू शकणार नाहीत, अशा व्यक्तींचे रोजगार (जॉब) कार्ड बनविण्यात येणार  नाही. मनरेगा जॉब कार्डसाठी पात्र होण्यासाठी काही महत्वपूर्ण मुद्दे खालीलप्रमाणे आहेत –

  • यामध्ये अर्जदार हा भारताचा कायमचा नागरिक असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे असावे.
  • पासपोर्ट आकाराचे दोन फोटो
  • मूळ पत्ता पुरावा
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • आधार कार्ड
  • शिधापत्रिका
  • मोबाईल नंबर