तुलडा बांबू उष्ण व समशीतोष्ण कटिबंधीय हवामानामध्ये चांगले उत्पन्न मिळते सदर बांबू ईशान्य भारतात उत्तराखंड पश्चिम बंगाल केरळ ओरिसा या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो यासाठी हा पर्जन्यमान 1500 ते 2500 मिमी एवढे लागते तसेच या बांबूसाठी पाण्याचा निचरा होणारी जमीन तसेच रेताड जमीन चिकन माती असलेली जमीन लागते टूलडा बांबूची रोपे ही बी पासून तसेच टिशू कल्चर पद्धतीने तयार केली जातात
या प्रजातीच्या लागवडीसाठी मातीचा थर कमीत कमी एक ते दीड फूट असावा पाणी आवश्यकतेप्रमाणे लागते. महाराष्ट्रातही या प्रजातीची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जात आहे या प्रजातीची लागवड सरी पद्धतीने व खड्डे खोदूनही केली जाते सरी पद्धतीमध्ये दोन सऱ्यांमधील अंतर 14 ते 16 फूट ठेवावे व रोपांमधील अंतर नऊ ते दहा फूट ठेवावे खड्डे पद्धतीमध्ये खड्ड्याचा आकार 60*60*60 सेंटीमीटर असावा खड्ड्यांमधील अंतर पाच बाय पाच मीटर असावे आणि पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन पद्धत वापरावी
रोपे लावताना प्रतिरोप पाच किलो शेणखत 100 ग्रॅम युरिया 100 ग्रॅम सुपर फॉस्फेट व 100 ग्रॅम डी ए पी मिसळावे
लागवडीनंतर शक्यतो पहिल्या वर्षामध्ये वेळोवेळी निंदणी करावी बांबूची बेट एकदा स्थिरावल्यानंतर बांबूची पानगळ होते त्यानंतर तन उगवत नाही तसेच बांबूचे कोंब जमिनीखाली आडवे वाढण्यास सुरुवात होते त्यातून फुटवे बाहेर येण्यास सुरुवात होते अशा वेळेस अगदी सुरुवातीस फुटव्यांना सूर्यप्रकाश मिळाला की वाढ मंदावते किंवा थांबते अशा वेळेस बांबूच्या बेटा भोवती बाजूची माती किंवा पालापाचोळा गोळा करून उंचवटा तयार करावा .वाढ होत असताना वेडेवाकडे वाढलेले बांबू वेळीच काढून टाकावे
या प्रजातीमध्ये दरवर्षी पावसाळ्यात आठ ते दहा नवीन कोंब येतात नवीन आलेल्या कोंबांना दरवर्षी कलर कोडींग करावी व त्याची संख्या व वर्ष रजिस्टर मध्ये नोंद करून ठेवावे की जेणेकरून कापणीच्या वेळेस कोणत्या वर्षाचे किती बांबू उपलब्ध आहे हे समजते व मजुरांनाही बांबू काढण्यास सोपे जाते अनावश्यक व अपरिपक्व बांबूंची तोड होत नाही
या प्रजातीमध्ये शक्यतो चार वर्षे पूर्ण वाढ झालेल्या बांबूच्या काठ्यांची तोड करावी कारण बांबू परिपक्व झाल्याने अगरबत्ती साठी त्याचा उपयोग केला जातो
या बांबूमध्ये उत्पादन हे शक्यतो काठ्यांचेच घेतले जाते दरवर्षी 17 ते 20 टन काट्या मिळतात
तुलडा प्रजातीच्या बांबूचा उपयोग अगरबत्ती काडी व फर्निचर साठी केला जातो यामध्ये 18 फूट काठी साठी चाळीस ते साठ रुपये तसेच आठ फूट बारीक काठी साठी 14 ते वीस रुपये व सहा फूट बारीक काठी साठी बारा ते पंधरा रुपये दर मिळतो या बांबूमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने त्याचा उपयोग फर्निचर व इमारत बांधकाम मध्येही केला जातो दरवर्षी एकरी एक ते दीड लाख रुपये उत्पन्न मिळते