प्रजातींचे नाव – चिनार

शास्त्रीय नाव – पोपुलस डेल्टोइड्स (Populus deltoids)

सामान्य नाव – पोपलर, ईस्टर्न कॉटन लाकूड

कूळ – सेलिकेसी (Salicaceae)

संभाव्य क्षेत्र – भारतात, चिनार सामान्यतः उत्तर-पश्चिम क्षेत्रात पंजाब, हरियाणा आणि उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल यासारख्या उत्तर-पश्चिम राज्यांमध्ये घेतले जाते.

उपयुक्त हवामान – ज्या ठिकाणी किमान तापमान ६ डिग्री सेल्सिअस आणि कमाल तापमान ४५ डिग्री सेल्सिअस पर्यंत असते अशा ठिकाणी चिनाराची लागवड केली जाते. खोल सुपीक चिकणमाती, वालुकामय चिकणमाती आणि सेंद्रिय पदार्थ असलेली गाळ असलेली माती त्याच्या चांगल्या वाढीसाठी उत्तम आहे. सावलीत असहिष्णु (intolerate) असले तरी, ते दंव आणि पाणी साचणे मोठ्या प्रमाणात सहन (tolerates) करते.

रोपवाटीका तंत्रज्ञान – पोपलर अभिवृध्दी बियाणे, कलमे आणि टिश्यू कल्चर या तिन्ही पद्धतींनी करता येतो, परंतु स्टेम कटिंग्जद्वारे अभिवृध्दी अधिक लोकप्रिय आहे.

बियाणे – चिनार सामान्यतः बियाण्यांपासून फक्त संशोधन प्रयोगांमध्ये किंवा कामांमध्ये उगवले जाते.

अभिवृध्‍दी– जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात, जेव्हा चिनाराचे झाड सुप्त अवस्थेत असते, तेव्हा त्याच्या (epicormic shoot) फांद्यांपासून सुमारे 20-22 सें.मी. लांबी आणि 1-2 सेमी. व्यासाची डहाळी घेऊन वाफ्यात कलमे लावण्यापूर्वी अल्ड्रिन (250 मिली आल्ड्रेन 30 ईसी) आणि इमिसान (Emisan) (250 ग्रॅम इमिसान-6) 100 लिटर पाण्यात विरघळवून 10 मिनिटे बुडवून ठेवावेत जेणेकरून कीटक रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही. कलमांची लागवड 80 सें.मी. x 60 सें.मी.च्या अंतरावर (inverted position मध्ये) लागवड करावी आणि लागवडीनंतर लगेच पाणी द्यावे. चिनार रोपांच्या निरोगी आणि चांगल्या वाढीसाठी, 150:75:50 नायट्रोजन: स्फुरद: पोटॅश या प्रमाणात आणि प्रति हेक्टर 10-12 टन चांगले कुजलेले शेणखत टाकावे. झिंक (20 कि.ग्रॅ./हे.) देणे आवश्यक आहे. नायट्रोजनचे एकूण प्रमाण तीन भागात विभागून वेगवेगळ्या वेळी दिले पाहिजे.

लागवड तंत्र – शेतात चिनार लागवड करण्यापूर्वी ट्रॅक्टर चालित औजाराद्वारे सुमारे 1.0 मीटर खोल आणि 15.0 सें.मी. व्यासाचे कुदळीच्या सहाय्याने खड्डे करावेत. खड्ड्यांमध्ये 2 किग्रॅ. चांगले कुजलेले शेणखत, 50 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट, 25 ग्रॅम पोटॅश खत यांचे मिश्रण भरावे. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात रोपे लावण्यासाठी योग्य आहे. यासाठी 1 वर्षाचे व 3-4 मी उंचीच्या रोपाची निवड करावी. शेतात चिनार लावण्यासाठी 5 मी. x 5m, 4m x 5m, 5m x 4m, 7m x 3.5 मी. किंवा 8 मी. x 2.5 मी. च्या अंतरावर लावले जाऊ शकते.

तण व्यवस्थापन

खुरपणी – लागवडीच्या पहिल्या वर्षी दोनदा निंदणी व खुरपणी करणे आवश्यक आहे.

रोपांची छाटणी – लागवडीनंतर दोन वर्षांनी चिनार छाटणीचे हिवाळ्यात काम सुरू करावे. Debudding चे काम मे व जून महिन्यात करावे.

खते – चिनारमधील खत आणि खतांचे प्रमाण जमिनीच्या सुपीकतेवर अवलंबून असते. तरीसुद्धा, चांगल्या वाढीसाठी योग्य प्रमाणात पोषक तत्वे द्यावीत. झिंकची कमतरता असल्यास 25 कि.ग्रॅ. प्रति हेक्‍टरी झिंक सल्फेट शेतात मिसळावे.

उपयुक्‍त कृषी वानिकी पध्‍दत– कृषी वनीकरणासाठी पोपलरचे जी. 48, उदय, G-3, W-22, W-32, W-39, S-7 आणि c-15 क्लोन अधिक योग्य मानले जातात. कृषी वनीकरणामध्ये ऊस, गहू, बरसीम इत्यादी पिके शेतकरी चिनारांमध्ये घेतात. तथापि, सघन लागवडीमध्ये, पहिली दोन वर्षात यशस्वीरित्या पिके घेतली जाऊ शकतात, त्यानंतर आले, हळद इत्यादींसारखी सावलीत उगवणारी पिके घेता येतात.

वनस्पती संरक्षण – पोपलरमध्ये रोपवाटिकांपासून शेतात लागवाडीपर्यंत 150 हून अधिक प्रकारच्या कीटक रोगांचा प्रादुर्भाव होतो. पॉपलर स्टेम बोअरर (Apriona cinerea) मुख्य खोडामध्ये सर्वात जास्त नुकसान करतो. त्याच्या नियंत्रणासाठी 5 मि.ली. फ्युमिगंट (पॅरा-डायक्लोरोबेन्झिन केरोसीन/कार्बन डायसल्फाइड) प्रत्येक छिद्रामध्ये टाकले जाते आणि छिद्र ओल्या मातीने बंद केले पाहिजे.

उत्पन्न – 6-8 वर्षे वयाच्या चिनाराचे प्रति हेक्टर/ प्रति वर्ष 20-40 घन मीटर पर्यंत उत्पन्न असू शकते.

उपयोग – प्लायवूड, हार्डबोर्ड, पॅकिंग बॉक्स, मॅच बॉक्स इत्यादी बनवण्यासाठी चिनार लाकूड वापरले जाते.

संपर्क व्यक्ती – ऑल इंडिया इंटिग्रेटेड प्रोजेक्ट सेंटर फॉर अॅग्रो फॉरेस्ट्री, जी. बी. यू.ए.टी. पंतनगर, उत्तराखंड

ऑल इंडिया इंटिग्रेटेड प्रोजेक्ट सेंटर फॉर ऍग्रो फॉरेस्ट्री, पीएयू, लुधियाना

ऑल इंडिया इंटिग्रेटेड प्रोजेक्ट सेंटर फॉर अॅग्रो फॉरेस्ट्री, सी सी एस एच ए यू , हिसार, हरियाणा